समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे
संचालित ३ अभ्यासिकेतील विद्यार्थी यांनी केले
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन ( सन २०१९ )
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन ( सन २०१९ )
दि. ११, १५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्ठान संचालित ३ अभ्यासिकेतील विद्यार्थी (इ. ३ री ते १० वी ) यांनी महात्मा फुले ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘आपले बाबासाहेब’ या नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केले. संपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्टीरूप बाबासाहेबांच्या गोष्टीवर आधारित असून त्याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम श्री. संदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत करून केले.
मंगळवार पेठेतील भिमनगर, इंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं. २ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत) येथील विद्यार्थ्यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहे. साधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.

मग प्रसंग आणि नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्वरूप दिले गेले.
याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना
सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं
देखील अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया सर्व उपस्थितांनी दिली.

नाटकाचा कोणताही अनुभव नसताना, कधीही रंगमंचावर न गेलेल्या गल्लीतील मुलांची अभिनयाची चुणूक पाहून सर्व नागरीक, रहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं लहानपण, त्यावयात त्यांना आलेले अनुभव, उच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभव, आणि यासर्वातून त्यांनी अत्यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठाव, संघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतो. विषमतेचे दाहक अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

त्यानंतर पारगे चौक, मंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळे, संस्था, संघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्या विधायक जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आली. संपूर्ण चौकच जणू निःशब्द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्यंत शांतपणे हे नाटक पाहत होता. यावेळी याच कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आला. असा उपक्रम पहिल्यांदाच मंगळवार पेठेत घेतला
असल्याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.
असल्याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.