२५१ इंदिरानगर मंगळवार पेठ, येथील वस्तीमध्ये २ वर्षापासून समता प्रतिष्ठान अभ्यासिका प्रकल्प चालवीत आहे. त्याच अभ्यासिकेच्या सभागृहामध्ये दि. ३ जानेवारी २०१९ रोजी नवीन अशा ग्रंथालयाचे उद्घाटन कॉ. मुक्ता मनोहर, जनरल सेक्रेटरी व प्रसिद्ध लेखिका , पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी याच भागातील नगरसेविका सौ. पल्लवीताई जावळे, नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी तसेच श्री. सदानंद शेट्टी ( माजी नगरसेवक ) प्रामुख्याने उपस्थित होते.
'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रम'
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिन, राजमाता जिजाऊ जयंती, माता रमाई आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्ष निमित्त
२५१ मंगळवार पेठ, इंदिरानगर येथील वस्तीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन मा. मुक्ता मनोहर, जनरल सेक्रेटरी ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन), मा. नगरसेविका पल्लवीताई जावळे, मा. नगरसेविका सुजाताताई शेट्टी, श्री. शेखरभाऊ जावळे ( सामाजिक कार्यकर्ता ) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री. सोनवणे व श्री. खंडागळे ( मार्कंडेय समाज सेवा मंडळ ), श्री. सस्ते पाटील (श्रीकृष्ण मित्र मंडळ ), सौ. जयश्री कांबळे ( आदर्श महिला मंडळ), तसेच सौरभ वेळेकर ( समन्वयक) व पल्लवी वेळेकर ( अभ्यासिका प्रमुख ) आणि सौ. अपर्णा चव्हाण ( अध्यक्ष, समता प्रतिष्ठान) सर्व सौ. अमृता मोरे पदाधिकारी ( समता प्रतिष्ठान, पुणे ), सौ. रेश्मा लेंगरे ( कार्यध्यक्ष, समता प्रतिष्ठान) यांनी विशेष सहकार्य केले.
मुक्ता मनोहर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाईच्या कामाची गरज आणि ओळख समाजाला होणे गरजेचे आहे. जात पात याच्या पलीकडे जाऊन सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलीनी महिलांनी सक्षम व्हायला हवे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धुरा केवळ शिक्षण आणि वाचनाच्या माध्यमातूनच पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी या वाचनालयाचा, ग्रंथालयाचा योग्य उपयोग आपण करायला हवा.
या प्रसंगी श्री. चंद्रकांत गमरे, अध्यक्ष ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन), श्री. प्रकाश चव्हाण, माजी कार्याध्यक्ष ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन), श्री. राम अडगळे ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन) हे पदाधिकारी उपस्थित होते. युनियन कडून या ग्रंथालयाला २५ पुस्तकच संच भेट देण्यात आला.
या प्रसंगी मा. पल्लवीताई जावळे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण आज या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुली महिलांनी शिक्षणाची कास धरून पुढेही आपली प्रगती करत राहावी. यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही प्रतिनिधी म्हणून करायला तयार आहोत. गट-तट सोडून आपण सर्वांनी एकत्र एवून अशा उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हायला हवे. महिलांसाठीही काही उपक्रम आपण भविष्यात या वस्तीमध्ये सुरु करण्यासाठी नक्कीच सहकार्य करू.
मा. पल्लवीती जावळे यांनी यावेळी ५० पुस्तके या अभ्यासिकेसाठी भेट देण्यात आली.
मा. सुजाताताई शेट्टी म्हणाल्या मुलांसाठी आम्ही देखील पुणे मनपाच्या सहकार्याने शाहू उद्यान येथे वाचनालय सुरु करीत आहोत. त्याचा हि लाभ सर्व मुल पालक यांनी घ्यावा. आम्ही देखील वस्तीतील सर्व उपक्रमासाठी सदैव सहकार्य करू. मा. श्री. सदानंद शेट्टी यांनी अन्नाभाऊ च्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या नावाने हे ग्रंथालय सुरु करून चांगले काम केल्याचे नमूद केले. शिक्षण आणि शिक्नाशी निगडीत उपक्रमचा पाया याच पद्धतीने पुढेही सुरु ठेवून आणखी २०-२५ ठिकाणी आपण हे काम करावे अशा शुभेच्चा हि त्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment