Labels

Tuesday, 15 December 2020

आपले बाबासाहेब नाटकाचे सादरीकरण ( सन २०१९ )

 

समता प्रतिष्‍ठानमंगळवार पेठपुणे
संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी यांनी केले 
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन ( सन २०१९ ) 

दि१११५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्‍ठान संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी (३ री ते १० वी यांनी महात्‍मा फुले ज्‍योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले बाबासाहेब’ या नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केलेसंपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्‍टीरूप बाबासाहेबांच्या गोष्‍टीवर आधारित असून त्‍याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम श्रीसंदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत करून केले.

मंगळवार पेठेतील भिमनगरइंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं२ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतयेथील विद्यार्‍थ्‍यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहेसाधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.

साधारण डिसेंबर ते मार्च या कालावधीत मुलांना नाटक आणि पथनाट्‌य याची माहिती देण्यात आलीत्‍यासाठी आवश्यक काही उपक्रम घेण्यात आलेअभिनय कार्यशाळासंवादफेक याची जुजबी माहिती मुलांना देण्यांत आलीत्‍यानंतर नाट्‌वाचन व पाठांतर असा साधारण परिपाठ करून एक महिना यावर मेहनत घेण्यात आली.

मग प्रसंग आणि नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्‍याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार सुट्‌टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्‍वरूप दिले गेले

याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना 
सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं 
देखील अतिशय हृदयस्‍पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया सर्व उपस्‍थितांनी दिली.

नाटकाचा कोणताही अनुभव नसतानाकधीही रंगमंचावर न गेलेल्‍या गल्‍लीतील मुलांची अभिनयाची चुणूक पाहून सर्व नागरीकरहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं लहानपणत्‍यावयात त्‍यांना आलेले अनुभवउच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभवआणि यासर्वातून त्‍यांनी अत्‍यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठावसंघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतोविषमतेचे दाहक अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

भिमनगर मंडळ येथील सांस्‍कृतिक महोत्‍सावाचे उद्‌घाटन याच नाटकाच्या सादरीकरणातून करण्यात आलेभिमनगरमधील मोठ्‌या संख्येने रहिवासीतसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी हे यावेळी उपस्‍थित होते.  तसेच पी.एम.सी.कॉलनी नं२ मंगळवार पेठ येथे ही हे नाटक सादर करण्यात आले

त्‍यानंतर पारगे चौकमंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळेसंस्‍थासंघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्‍या विधायक जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आलीसंपूर्ण चौकच जणू निःशब्‍द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्‍यंत शांतपणे हे नाटक पाहत होतायावेळी याच कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आलाअसा उपक्रम पहिल्‍यांदाच मंगळवार पेठेत घेतला 
असल्‍याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.




No comments:

Post a Comment