क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमित्त
महात्मा फुले वाडा समता भूमीला भेट
दि. ३ जानेवारी २०२१
समता प्रतिष्ठान, (मंगळवार पेठ) पुणे तर्फे
दि. जानेवारी २०२१ रोजी महात्मा फुले वाडा गंज पेठ,
समता भूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी
मुली आणि विशेषतः महिला यांनी भेट दिली.
यावेळी मुलींना सर्व वाडा दाखविण्यात आला.
त्यामध्ये आतील विहीर, खोल्या यांचाही भाग दाखविण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी कु. ऋतुजा नराल या ताईने
सर्व महिला उपस्थित मुलीना सावित्रीबाईंच्या कार्याची नीट
सविस्तर माहिती दिली आणि प्रबोधनही केले.
याच मुलींच्या गटातील कु. स्नेहल लालबिगे या मुलीने
तू बुद्धी दे, तू तेज दे हि प्रार्थना हि यावेळी सदर केली.
रेखा गायकवाड यांनी सावित्रीच्या ओव्या गाऊन
उपस्थिताना सावित्रीबाईच्या कार्याची एक ओळखच करून दिली
यावेळी समता प्रतिष्ठानचे संदीप मोरे, रेखा गायकवाड, अमृता मोरे, रेश्मा लेंगरे उपस्थित होते.
महिला पालक हि यावेळी उपस्थित होत्या. समता प्रतिष्ठान मार्फत आंगण या अभ्यासिकेतील विद्यार्थिनी हि उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment