Labels

Thursday, 3 December 2020

SAHITYRTNA ANNABHAU SATHE LIBRARY - PROGRAM




साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे 
ग्रंथालय उद्घाटन 
दि. ३ जानेवारी २०१९ 


              २५१  इंदिरानगर मंगळवार पेठ, येथील वस्तीमध्ये २ वर्षापासून समता प्रतिष्ठान अभ्यासिका प्रकल्प चालवीत आहे. त्याच अभ्यासिकेच्या सभागृहामध्ये दि. ३ जानेवारी २०१९ रोजी नवीन अशा ग्रंथालयाचे उद्घाटन  कॉ. मुक्ता मनोहर, जनरल सेक्रेटरी व प्रसिद्ध लेखिका ,  पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले.
              याप्रसंगी याच भागातील नगरसेविका सौ. पल्लवीताई जावळे, नगरसेविका  सौ. सुजाता शेट्टी तसेच श्री. सदानंद शेट्टी ( माजी नगरसेवक ) प्रामुख्याने उपस्थित होते.    

'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रम'

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जन्मदिन, राजमाता जिजाऊ जयंती, माता रमाई आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद  यांच्या संयुक्त जयंती तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  जन्म शताब्दी वर्ष  निमित्त 
२५१ मंगळवार पेठ, इंदिरानगर येथील वस्तीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन मा. मुक्ता मनोहर, जनरल सेक्रेटरी ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन),  मा. नगरसेविका पल्लवीताई जावळे, मा. नगरसेविका सुजाताताई शेट्टी, श्री. शेखरभाऊ जावळे ( सामाजिक कार्यकर्ता ) यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी श्री. सोनवणे व श्री. खंडागळे ( मार्कंडेय समाज सेवा मंडळ ), श्री. सस्ते पाटील (श्रीकृष्ण मित्र मंडळ ), सौ. जयश्री कांबळे ( आदर्श महिला मंडळ), तसेच सौरभ वेळेकर ( समन्वयक) व पल्लवी वेळेकर ( अभ्यासिका प्रमुख ) आणि सौ. अपर्णा चव्हाण ( अध्यक्ष, समता प्रतिष्ठान) सर्व सौ. अमृता मोरे पदाधिकारी ( समता प्रतिष्ठान, पुणे ), सौ. रेश्मा लेंगरे ( कार्यध्यक्ष, समता प्रतिष्ठान) यांनी विशेष सहकार्य केले. 


मुक्ता मनोहर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाईच्या कामाची गरज आणि ओळख समाजाला होणे गरजेचे आहे. जात पात याच्या पलीकडे जाऊन सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलीनी महिलांनी सक्षम व्हायला हवे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धुरा केवळ शिक्षण आणि वाचनाच्या माध्यमातूनच पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी या वाचनालयाचा, ग्रंथालयाचा योग्य उपयोग आपण करायला हवा. 


या प्रसंगी श्री. चंद्रकांत गमरे, अध्यक्ष ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन), श्री. प्रकाश चव्हाण, माजी कार्याध्यक्ष ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन), श्री. राम अडगळे  ( पुणे महानगरपालिका कामगार युनियन) हे पदाधिकारी उपस्थित होते. युनियन कडून या ग्रंथालयाला २५ पुस्तकच संच भेट देण्यात आला.



या प्रसंगी मा. पल्लवीताई जावळे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण आज या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुली महिलांनी शिक्षणाची कास धरून पुढेही आपली प्रगती करत राहावी. यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही प्रतिनिधी म्हणून करायला तयार आहोत. गट-तट सोडून आपण सर्वांनी एकत्र एवून अशा उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हायला हवे. महिलांसाठीही काही उपक्रम आपण भविष्यात या वस्तीमध्ये सुरु करण्यासाठी नक्कीच सहकार्य करू. 

मा. पल्लवीती जावळे यांनी यावेळी ५० पुस्तके या अभ्यासिकेसाठी भेट देण्यात आली.  






मा. सुजाताताई शेट्टी म्हणाल्या मुलांसाठी आम्ही देखील पुणे मनपाच्या सहकार्याने  शाहू उद्यान येथे वाचनालय सुरु करीत आहोत. त्याचा हि लाभ सर्व मुल पालक यांनी घ्यावा. आम्ही देखील वस्तीतील सर्व उपक्रमासाठी सदैव सहकार्य करू.  मा. श्री. सदानंद शेट्टी यांनी अन्नाभाऊ च्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या नावाने हे ग्रंथालय सुरु करून चांगले काम केल्याचे नमूद केले. शिक्षण आणि शिक्नाशी निगडीत उपक्रमचा पाया याच पद्धतीने पुढेही सुरु ठेवून आणखी २०-२५ ठिकाणी आपण हे काम करावे अशा शुभेच्चा हि त्यांनी दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. संदीप मोरे ( संस्थापक, समता प्रतिष्ठान) यांनी केले. 
समारोप व आभार पल्लवीताई सरोदे  ( समन्वयक, समता प्रतिष्ठान) 
यांनी सावित्रीबाईंच्या कविता म्हणून केले. 




Monday, 4 May 2020

समता प्रतिष्‍ठान संचालित उपक्रम - ४ अभ्‍यासिका



समता प्रतिष्‍ठान, पुणे.

समता प्रतिष्‍ठान संचालित उपक्रम -  ४ अभ्‍यासिका सद्यस्‍थिती मंगळवार पेठेत मागील ६ वर्षांपासून 

समता प्रतिष्‍ठान हि संस्था भिमनगर आणि जवळच्या परिसरात  सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक 

उपक्रम राबवीत आहे.   यातीलच एक उपक्रम म्हणजे मोफत अभ्यासिका वर्ग. 


विद्यार्थी करिता मोफत अभ्‍यासिका घेण्याचे काम सातत्‍याने करीत  आहे. या अभ्‍यासिकांच्या माध्यमातून 


मुख्यतः मुलांचा स्‍वविकास आणि पर्यायाने कुटुंबाचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाही विकास असा 

हेतू आहे. या उपक्रमामध्ये मुख्यतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर जास्‍त भर दिला जातो. 

 


केवळ घोकंपट्‌टी करण्यापेक्षा संकल्‍पना स्‍पष्‍टीकरण करणे यावर लक्ष केंद्रीत केले जाते.  स्‍पून फिडिंग 

न करता स्‍वयंअध्ययन कसे  करतील यासाठी मार्गदर्शन केले जाते. याकरीता खेळघर, भूमी सारख्या 

संस्‍थाची मदत घेतली जाते.  त्‍यांच मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. 




यासाठी काही स्‍वयंसेवक येऊन मार्गदर्शन


करण्याचे कामही शनिवार, रविवार 



करतात. त्‍याचबरोबर अभ्‍यास सहली, 



चर्चासत्रे, उन्हाळी हिवाळी शिबीरे घेतली 



जातात. ज्‍यामुळे विद्यार्‍थ्‍यांना आणखी 

सखोल ज्ञान या विषयांचे मिळते.

सध्या भिमनगर, इंदिरानगर, 

पी.एम.सी.कॉलनी नं. २, न्यू भिमनगर, सर्व 

अभ्‍यासिका या मंगळवार पेठे  येथे घेण्यांत 

येतात. यामध्ये साधारण २०-२५ विद्यार्थी 

आठवडयातून ५ दिवस सोमवार ते 

गुरूवार  सांयकाळी  ६ ते ८ या वेळात  असतात. 



तसेच शनिवार, रविवार  विशेष गणित, इंग्रजी आणि संगणक वर्ग 

सकाळी ९ ते ११  भूमी या संस्‍थेमार्फत घेतले जातात.










"गोष्टरंग" - एक मजेदार नाट्य अनुभव 

गोष्टरंग. 

दिवाळी सणाच्या निमित्ताने समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे 
दरवर्षी विविध उपक्रम विद्यार्थ्यांकरिता राबवीत असते. दिवाळी शिबीर, दिवाळी सहल, दिवाळी भेट. 
यापैकीच एक उपक्रम या सुट्टीत राबविला. 




''क्वेस्ट'' संस्थेच्या, माध्यमातून.  शिक्षण क्षेत्रात भाषा आणि गणित यासाठी विशेष उल्लेखनीय असं काम करणारी पालघर, सानोळा येथील संस्था. 
यांचाच एक उपक्रम आहे गोष्टरंग. 



देशविदेशातील लहान मुलांसाठी तयार केलेल्या गोष्टी. 
या गोष्टींचं अप्रतिम असं मनोरंजनात्मक सादरीकरण. 
हा कार्यक्रम आम्ही समता प्रतिष्ठानच्या आणि पुणे मनपा  कामगार युनियन च्या  सहकार्याने 
दि. २३ ऑक्टोबर २०१९ सांयकाळी ६ ते ८ यावेळात  श्रमिक भवन,  शिवाजीनगर येथे सादरीकरण करण्यात आले. 





मंगळवार पेठेतील ४ अभ्यासिकामधील ५० विद्यार्थी आणि १० कार्यकर्ते, पत्रकार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला. 
केवळ टी.व्ही  आणि मोबाईल च्या जाळ्यात गुंग असलेली आजची बालगोपाळांची आणि युवकांची पिढी आपण आज अवती भवती पाहत आहोत. म्हणूनच आम्ही समता प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांना सतत त्यांच्यातील सुप्त गुण, जाणीवा समृद्ध करण्याचा प्रयत्न मागील ५ वर्षांपासून करीत आहोत.


यामध्ये चांदण्यातील गप्पा ( लहान  सादर केलेल्या विविध देशातील गोष्टी ), पथनाट्य, वाचन चर्चा असे विविधांगी उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे करत आहोत. 
या आमच्या कामात क्वेस्ट सारख्या सामाजिक भान असलेल्या संस्था, व्यक्ती  मदतीला धावून येतात त्यामुळे आजपर्यंत आमचं हे काम अविरत चालू आहे. 

सर्व गोष्टरंग टीमची अदभूत अशी ऊर्जा पाहून केवळ आणि केवळ आश्चर्य वाटत राहते. मुलांच्या मनोभावना, कल्पना यांचा सुयोग्य असा विचार करून लिहीलेल्या गोष्टी, गाणी जबरदस्त. त्यातच  अप्रतिम असे गीतांजली ताईं कुलकर्णी  यांचे दिग्दर्शन यासाठी शब्दच नाहीत.

कमीत कमी साहित्य, रंगमंच यांचा चपळतेने केलेला उपयोग केवळ अवार्णिनीय असाच होता. त्यात इतर देशातील माहित नसलेल्या  भूभागातील लोकांच्या गोष्टी योग्य भावभावनांच्या माध्यमातून केलेलं सादरीकरण खूपच मनाला स्पर्श करणारे होते.
याची प्रचिती म्हणजे कलाकारांबरोबर मुलंदेखील गात होती, प्रतिसाद देत होती, रमून जात होती. यालाच तादात्म्य पावणं असं म्हणत असावेत बहुतेक. यातच संपूर्ण कलाकारांचे खरे यश दडले आहे. संपूर्ण शरीर आणि हावभावाचा उपयोग कसा करावा याच उत्तम उदाहरण हे या कलाकारांनी घालून दिलेलं आहे.


येवढ्यावेळ ५ वी ते १० वी च्या गटातील विद्यार्थी असा मनमुराद आनंद घेत एखाद्या नाटकाच्या विषयात रंगून जाणं हा अनुभव आमच्यासाठी तरी अगदी नवीनच होता.



जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आपण नाममात्र शुल्कात आमच्या वस्तीपातळीवरील मुलांसाठी केलेलं हे योगदान नक्कीच भविष्यात त्यांच्या आयुष्यात लक्षात राहणारे आणि उपयोगी पडेल असेच आहे. 

Tuesday, 3 December 2019

रोटरी क्‍लब ऑफ पुणे प्राईड आणि खेळघर संस्‍था गणित संकल्‍पना प्रशिक्षण दि. ११, १२ आणि १३ ऑगस्‍ट २०१९


भास्कराचार्य प्रतिष्ठान, आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड ग्रुप तर्फे
                              
                                                   दि. १०, ११ आणि १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान

                                                   गणिताच्या मूलभूत संकल्पना कार्यशाळा 

गणिताच्या मूलभूत संकल्पना खास शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 
या कार्यशाळेत समता प्रतिष्ठानच्या ७ समनव्यक यांनी सहभाग घेतला होता. 
या कार्यशाळेत विशेषतः इ. पहिली ते ४ थी च्या मुलांसाठीचे गणित कशा पद्धतीने शिकवावे ?
मुळात आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत का ?
आपण त्या कशा सांगतो? मांडतो ? ती पद्धत कशी आहे ? याबरोबरच कृती आधारित शिक्षण कसे सोप्या पद्धतीने शिकवावे ?





या कार्यशाळेत सर्व समता प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते, समन्वयक यांनी उत्तम सहभाग तर घेतलाच, 
शिवाय या कार्यशाळेतून विशेष अनुभवही मिळवला. 
विपुल अभ्यंकर आणि श्री. ठोसर यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वाना मार्गदर्शन केले. 



संकल्पना स्पष्ट असेल तर शिकवण हि सोप्प होत अशी पद्धती त्यांनी सर्वांकडून 
छान करवून आणि समजवून सांगितल्या. 






समारोप कार्यक्रमात सर्व शिक्षकांसमोर समता च्या कार्यकर्त्यानी आपल्या संस्थेच्या कामाचे अनुभव मांडले. 
सर्वानी त्यांचे कौतुकहि केले. 



Tuesday, 27 August 2019



ग्रहांची रचना, मालिका आणि अवकाश
या बद्‌दल माहितीचे कृतीवर आधारित कार्यक्रम

भूमी एनजीओ संपूर्ण भारतभर वस्‍तीपातळीवर, अनाथाश्रमात, विविध सामाजिक संघटना, शाळांमध्ये स्‍वयंस्‍फर्तीने कोणताही मोबदला न घेता शिक्षण प्रसारासाठी काम करते. 

यातीलच काही स्‍वयंसेवक दर शनिवार, रविवारी समता प्रतिष्‍ठानच्या 4 
  अभ्‍यासिकांमध्ये येऊन इंग्रजी, गणित, आर्टून्स, सायन्स असे विषय घेऊन हसत 
   खेळत, कृती कार्यक्रम घेऊन मुलांना विविध विषयातील संकल्‍पना शिकवितात.


                                          

   दि. २ जून २०१९ रोजी अशाच प्रकारे इ. ७ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्‍थ्यांना त्‍यांनी 
   ग्रह आणि त्‍यांची अवकाशातील स्‍थिती याबद्‌दल माहिती दिली. यासाठी मुलांना 
   स्‍वतः विविध ग्रह कागद, थर्माकोल आणि रंगाच्या साहय्‍याने तयार करायला 
   सांगितले. विविध गट करून त्‍यात चर्चा आणि गप्पांमधून ग्रहांबद्‌दल प्राथमिक 
   माहिती दिली.


   त्‍यानंतर सर्व मुलांनी तयार केलेल्‍या ग्रहांना एकत्र करून संपूर्ण ग्रह मालिका 
   त्‍यांच्या त्‍यांच्या स्‍थानानुसार तयार करून घेतली. एकाच कागदावर ही ग्रह 

   मालिका दिसेल समजेल अशा पद्धतीने चिकटवून लावून घेतली.



   यानंतर मुलांनी विचारलेल्‍या प्रश्नांची अत्‍यंत समर्पक अशी उत्तरे या भूमीच्या 
   कार्यकर्ते यांनी दिली. यामुळं मुलांची उत्‍सुकता आणखी वाढली. शास्‍त्र हे 
  आपल्‍या जीवनाशी कसे जुळलेले आहे? किती सोपे आहे असा भाव सर्वांनी व्यक्‍त 
   केला.




Wednesday, 21 August 2019

१४ एप्रिल २०१९ भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम




समता प्रतिष्‍ठानने  अशी केली भिमजयंती साजरी सन - २०१९ 


दि. १४ एप्रिल रविवार या दिवशी समता प्रतिष्‍ठान संचालित अभ्‍यासिकेतील विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी एक आगळी वेगळी अशी जयंती साजरी केली.
श्री. गणेश वाघमारे यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले. 


बाबासाहेबांनी दिलेला मूलभूत शिक्षणाचा हक्‍क आणि सर्व मागासवर्गींयांना मिळवून दिलेली संधी याचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत.
एवढेच नाहीतर त्‍यांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून किती सखोल अभ्‍यास करून सर्वच भारतीयांचे भाग्‍य उजळले आहे असेही त्‍यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून अत्‍यंत सोप्या शब्‍दांत समजतील अशा गोष्‍टी श्री. गणेश वाघमारे यांनी मुलांना सांगितल्‍या.


कार्यक्रमाच्या सुरूवातीला अभ्‍यासिकेतील विद्यार्‍थ्‍यांनी भिमवंदना गाऊन बाबसाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्यांची ओळख आणि स्‍वागत श्री. रवींद्र चव्हाण यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रेखा गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे रेश्मा लेंगरे यांनी केले. सूत्र संचालन श्री. संदीप मोरे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास समता प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते मयूर खांदोडे, शुभम वेळेकर, पल्‍लवी वेळेकर, पल्‍लवी सरोदे, दिक्षा घोडके, अपर्णा चव्हाण, प्रियंका परदेशी, सुपज्ञा चव्हाण उपस्‍थित
 होते. 

समता प्रतिष्‍ठानमंगळवार पेठपुणे
संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी यांनी केले 
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन 

दि. ११, १५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्‍ठान संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी (. ३ री ते १० वी ) यांनी महात्‍मा फुले ज्‍योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले बाबासाहेबया नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केले. संपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्‍टीरूप बाबासाहेबांच्या गोष्‍टीवर आधारित असून त्‍याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम श्री. संदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत करून केले.

मंगळवार पेठेतील भिमनगर, इंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत) येथील विद्यार्‍थ्‍यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहे. साधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.
साधारण डिसेंबर ते मार्च या कालावधीत मुलांना नाटक आणि पथनाट्‌य याची माहिती देण्यात आली. त्‍यासाठी आवश्यक काही उपक्रम घेण्यात आले. अभिनय कार्यशाळा, संवादफेक याची जुजबी माहिती मुलांना देण्यांत आली. त्‍यानंतर नाट्‌वाचन व पाठांतर असा साधारण परिपाठ करून एक महिना यावर मेहनत घेण्यात आली.
मग प्रसंग आणि नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्‍याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार सुट्‌टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्‍वरूप दिले गेले. याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं 
देखील अतिशय हृदयस्‍पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया सर्व उपस्‍थितांनी दिली.

नाटकाचा कोणताही अनुभव नसताना, कधीही रंगमंचावर न गेलेल्‍या गल्‍लीतील मुलांची अभिनयाची चुणूक पाहून सर्व नागरीक, रहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं लहानपण, त्‍यावयात त्‍यांना आलेले अनुभव, उच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभव, आणि यासर्वातून त्‍यांनी अत्‍यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठाव, संघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतो. विषमतेचे दाहक अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

भिमनगर मंडळ येथील सांस्‍कृतिक महोत्‍सावाचे उद्‌घाटन याच नाटकाच्या सादरीकरणातून करण्यात आले. भिमनगरमधील मोठ्‌या संख्येने रहिवासी, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी हे यावेळी उपस्‍थित होते.  तसेच पी.एम.सी.कॉलनी नं. २ मंगळवार पेठ येथे ही हे नाटक सादर करण्यात आले

त्‍यानंतर पारगे चौक, मंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळे, संस्‍था, संघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्‍या विधायक जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आली. संपूर्ण चौकच जणू निःशब्‍द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्‍यंत शांतपणे हे नाटक पाहत होतायावेळी याच कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आला. असा उपक्रम पहिल्‍यांदाच मंगळवार पेठेत घेतला 
असल्‍याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.