ग्रहांची रचना, मालिका आणि अवकाश
या बद्दल माहितीचे कृतीवर आधारित कार्यक्रम
भूमी एनजीओ संपूर्ण भारतभर वस्तीपातळीवर, अनाथाश्रमात, विविध सामाजिक संघटना,
शाळांमध्ये स्वयंस्फर्तीने कोणताही मोबदला न घेता शिक्षण प्रसारासाठी काम करते.
यातीलच काही स्वयंसेवक दर शनिवार, रविवारी समता प्रतिष्ठानच्या 4
अभ्यासिकांमध्ये
येऊन इंग्रजी, गणित, आर्टून्स, सायन्स असे विषय घेऊन हसत
खेळत, कृती कार्यक्रम घेऊन
मुलांना विविध विषयातील संकल्पना शिकवितात.

दि. २ जून २०१९ रोजी अशाच प्रकारे इ. ७ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांनी
ग्रह आणि त्यांची अवकाशातील स्थिती याबद्दल माहिती दिली. यासाठी मुलांना
स्वतः विविध ग्रह कागद, थर्माकोल आणि रंगाच्या साहय्याने तयार करायला
सांगितले. विविध गट करून त्यात चर्चा आणि गप्पांमधून ग्रहांबद्दल प्राथमिक
माहिती दिली.
त्यानंतर सर्व मुलांनी तयार केलेल्या ग्रहांना एकत्र करून संपूर्ण ग्रह मालिका
त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार तयार करून घेतली. एकाच कागदावर ही ग्रह
मालिका दिसेल समजेल अशा पद्धतीने चिकटवून लावून घेतली.
यानंतर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक अशी उत्तरे या भूमीच्या
कार्यकर्ते यांनी दिली. यामुळं मुलांची उत्सुकता आणखी वाढली. शास्त्र हे
आपल्या जीवनाशी कसे जुळलेले आहे? किती सोपे आहे असा भाव सर्वांनी व्यक्त
केला.
No comments:
Post a Comment