Labels

Friday, 13 January 2023

Samata Birthday 8 January 2023


समता प्रतिष्ठान, 

मंगळवार पेठ, पुणे 

८ वा वर्धापन दिन 

क्रांती. सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्तसमता प्रतिष्ठान, पुणे चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.



                                        


सर्व उपस्थित कार्यकर्ते क्रा. सावित्रीबाई फुले व महात्यामा फुले यांच्या प्रतिमेस  अभिवादन करताना.

                                                  

                                             

                                   

कार्यक्रमाची सुरुवात  "मी सावित्री बोलतेय" हा एकपात्री प्रयोग भक्ती प्रधान या मुलीने सादर करून झाली.


                                    



अत्‍यंत  सुंदर असे सादरीकरण तिने केले. सर्व पालक आणि विद्यार्थी तिच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झाले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी नृत्‍य, गायन आणि वक्तृत्‍व याप्रकारे आपली कला सर्वांसमोर सादर केली. मुलींचे नृत्‍य पाहून पालकांनी आणि पाहुण्यांनी विशेष दादही दिली. 



अत्‍यंत  सुंदर असे सादरीकरण तिने केले. सर्व पालक आणि विद्यार्थी तिच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झाले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी नृत्‍य, गायन आणि वक्तृत्‍व याप्रकारे आपली कला सर्वांसमोर सादर केली. मुलींचे नृत्‍य पाहून पालकांनी आणि पाहुण्यांनी विशेष दादही दिली. 




साहित्यरत्न अन्नाभावू साठे अभ्यासिकेतील मुलांनी गीत सदर केले. 




या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निशाद शेख व साक्षी जाधव, सानिका सरोज यांनी केले. मदत करणा-या सर्वांचे आभार समृद्धी पाटोळे या विद्यार्थीनीनी केले. यावेळे समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अमन शेख, सम्यक चव्हाण, राज कदम, तनिष्क उबाळे, मयूर ढावरे, सौरभ वेळेकर, प्राजक्ता कांबळे, अदिती साठे, निशांत वाघमारे, साक्षी शर्मा, संतोष शर्मा, कार्तिक शेलार या सर्वांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात मदत केली. 






श्री. हरेश सूळ यांनी सर्व मुलांचे कौतूक केले. ग्रामीण भागात असे उपक्रम नव्हते त्‍यामुळे आम्हाला असं काही शिकायला मिळालं नाही. त्‍याचा परिणाम आत्‍मविश्वास कमी होता. मात्र समता प्रतिष्ठान अभ्यासिकांच्या मार्फत करत असलेले काम हे अत्‍यंत महत्‍वाचे असून याचा उपयोग भविष्यात नक्कीच मुलांना होईल. पालकांनी यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी काहीही मदत, सहकार्य हवं असेल तर आम्ही करू असे आश्वासनही त्‍यांनी दिले. 



सौ. स्वाती भोसले यांना शारदा महिला संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाल्याने त्‍यांचाही सत्‍कार करण्यात आला. 













                                                यावेळी मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. 





डॉ. भक्ती वारे मॅडम, श्रीमती माळी मॅडम यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करत समताच्या कामास शुभेच्च्छा दिल्या. 






      यावेळी पालकांनी  आपले मनोगत व्यक्त केले. 



सौ. अमृता मोरे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. 


यावेळी अभ्यासिकेतील ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍य वाटप करण्यात आले. त्‍याचबरोबर उत्‍तम सादरीकरण करणा-या मुलांना पारितोषिकही देण्यांत आली. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 







शेवटी प्रार्थना घेवून कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी, निषाद आणि सानिका ने केल 



यावेळी या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हरेश सूळ ( अपर तहसिलदार व परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी, खेड ) डॉ. भक्ती वारे ( होमियोपॅथी ), श्रीमती माळी मॅडम ( शारदा संस्था ), समताचे पदाधिकारी व विश्वस्त श्री. शुभम वेळेकर, सौ. रेखा गायकवाड, सौ. अमृता मोरे हे उपस्थित होते. यावेळी समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदीप मोरे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या काळातील समताच्या कामाची गरज आणि त्‍याकरीता शिक्षणाचे माध्यम का महत्‍वाचे आहे हे त्‍यांनी सर्वांना सांगितले. समताने वर्षभर केलेल्या विशेष कामे, प्रकल्प याबद्‌दल माहिती दिली. 







कु. समृद्धी पाटोळे ( इ. ९ वी ) हिने सर्व उपस्थित आणि मान्यवर यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता झाली.

Thursday, 3 November 2022

STUDY SKILLS SESSION FOR STUDENT'S 2 NOV 22

 

अभ्यास कौशल्य मार्गदर्शन व्याख्यान 
मार्गदर्शक - श्री. प्रविण महामुनी ( शिक्षक, कोचिंग क्लासेस ) 
दि. २/११/२०२२



















श्री.  प्रविण महामुनी ( Coaching Class teacher )  यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी इ. ८ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांना अभ्यास कौशल्य या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले. यावेळी त्‍यांनी मुलांना अत्‍यंत सोप्या आणि मनोरंजनात्‍मक पद्धतीने मार्गदर्शन केले. सुरूवातीला मुलांनी आपले ध्येय आणि उद्‌दीष्ट नक्की केले पाहिजे. किती मार्क्स मला मिळवायचे आहेत हे नीट ठरवलं पाहिजे. अभ्यास करताना अवघड वाटतील असे तक्ते, व्याख्या सतत डोळयासमोर राहिल असे पाहिले पाहिजे.

विविध संकल्पना समजून घेताना इतरांची मदत घ्या, ती समजतील असे पहा. आपली परिक्षा आपणच घेऊन पहा, प्रश्न तयार करा, तो प्रश्नसंच सोडवा. हे करताना महत्‍वाचे आहे आपले वेळेचे नियोजन. किती वेळ कशाला द्यायचा ?अभ्यासाला कसा वेळ काढायचा हे ही समजून सांगितले. अभ्यास कौशल्याचा पहिला टप्पा म्हणून आपण या चर्चासत्राचे आयोजन केले होते. लवकरच यापुढील टप्पा ही समता मार्फत घेण्यात येईल असे समारोप प्रसंगी सांगण्यात आले.