श्री. प्रविण महामुनी ( Coaching Class teacher ) यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी इ. ८ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांना
अभ्यास कौशल्य या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुलांना अत्यंत
सोप्या आणि मनोरंजनात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. सुरूवातीला मुलांनी आपले
ध्येय आणि उद्दीष्ट नक्की केले पाहिजे. किती मार्क्स मला मिळवायचे आहेत हे नीट
ठरवलं पाहिजे. अभ्यास करताना अवघड वाटतील असे तक्ते, व्याख्या सतत डोळयासमोर राहिल असे
पाहिले पाहिजे.
विविध संकल्पना समजून घेताना इतरांची मदत घ्या, ती समजतील असे पहा. आपली परिक्षा आपणच घेऊन पहा, प्रश्न तयार करा, तो प्रश्नसंच सोडवा. हे करताना महत्वाचे आहे आपले वेळेचे नियोजन. किती वेळ कशाला द्यायचा ?अभ्यासाला कसा वेळ काढायचा हे ही समजून सांगितले. अभ्यास कौशल्याचा पहिला टप्पा म्हणून आपण या चर्चासत्राचे आयोजन केले होते. लवकरच यापुढील टप्पा ही समता मार्फत घेण्यात येईल असे समारोप प्रसंगी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment