Labels

Monday, 11 January 2021

१० जानेवारी २०२१ समता प्रतिष्ठान ६ वा वर्धापन दिन कार्यक्रम

 


१० जानेवारी २०२१ 
६ वा वर्धापन दिन 



समता प्रतिष्ठान, पुणे
दि. १० जानेवारी ६ वा वर्धापन दिन कार्यक्रम बातमी

क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांच्या जन्मदिनी समता प्रतिष्ठान या संस्थेला 
६ वर्ष पूर्ण होत असल्याने दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही वर्धापन दिन साजरा करण्यात आला.



किमान मुली महिलांना सावित्रीबाई आणि त्यांच्या कामाची ओळख तरी व्हावी आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण आणि सामाजिक कामात नवीन काहीतरी घडवावं असा उद्देश यामागे होता आणि आहे. 



४ वर्षात पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत. याच अभ्यासिकेतील विद्यर्थ्याना आपली कला सदर करणे आणि त्यांच्या कला गुणांना वाव देणे या उद्देशाने दरवर्षी स्नेह संमेलना सारखाच हा कार्यक्रम घेण्यात येतो. 







तसेच उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देवून, खावू ही  देण्यात आला. 
ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली त्यांचा व सहकार्य केले अशा सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 



या कार्क्रमासाठी श्री. विजय नवले सर ( करिअर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ते ) उपस्थित होते. 
त्यांनी यावेळी अत्यंत छान सोप्या पद्धतीने उपस्थित पालक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. समता प्रतिष्ठान करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. वास्तीपातालीवरील मुला / मुलींना शिक्षणासाठी मदत करणे यासारखे महत्वाचे काम ते करत आहेत. एवढेच नाही तर समाजा प्रती असलेली आपली कृतज्ञता हि त्यांनी पोलिस, डॉक्टर आणि काही कर्मचारी यांचा सन्मान करून व्यक्त करत आहेत. 
अशा स्वरुपाची कामे सहसा फार आपल्याला आढळून येत नाहीत. 
आज अनेक ठिकाणी समाजात असलेल्या गरजांचा विचार करता अशा कामाची गरजचा राहता कामा नये अशी परिस्थिती निर्माण करणे आपल्या विद्यर्थी पालकांच्या हातात आहे. 
याकरिता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व महिला मुली यांनी या कामातून प्रेरणा घेवून पुढे जावून आणखी छान काम करावं अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. 




या कार्यक्रमासाठी समता प्रतिष्ठानचे चे पदाधिकारी सौ. अपर्णा चव्हाण ( अध्यक्ष ),  सौ. रेश्मा लेंगरे-कारभारी ( कार्यध्यक्ष ), सौ. अमृता मोरे ( विश्वस्त सदस्य ), सौ. रेखा गायकवाड  ( विश्वस्त सदस्य) कु. पल्लवी सरोदे  ( विश्वस्त सदस्य ), श्री. संतोष शर्मा  ( विश्वस्त सदस्य ), इतर कार्यकर्ते दीपक वारे, शीतल शेखे, राजश्री जाधव, रिया उबाळे, सौरभ वेळेकर, सम्यक चव्हाण, अमन शेख, ताई अर्जुन, नरेश लालबिगे, निशांत वाघमारे आणि या कार्यक्रमासाठी  साठी सहकार्य करणारे विद्यार्थी संग्राम उबाळे, राज कदम ही उपस्थित होते. 



सदर कार्यक्रमासाठी कोरोना सन्मानार्थी म्हणून श्री. बालाजी शेंडगे ( ए.पी.आय.) श्री. थरकुडे ( ए.एस.आय.), डॉ. नेहा देशपांडे ( पीएमसी ), श्री. किशोर भोसले सर समाजिक कार्यकर्ते, श्रीमती आशा चव्हाण (आया), श्रीमती मधुमती मिसाळ ( सफाई कामगार ) हे उपस्थित होते. यांचा सत्कार एक पुस्तक ( चरित्र ) देवून करण्यात आला. 






या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी सरोदे यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. अमृता मोरे आणि आभार प्रदर्शन सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले.  




यावरही या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष काम केलेल्या पोलीस, डॉक्टर आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. 




































Wednesday, 6 January 2021

महात्मा फुले वाडा समता भूमीला भेट दि. ३ जानेवारी २०२१

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमित्त 

महात्मा फुले वाडा समता भूमीला भेट 

दि. ३ जानेवारी २०२१ 

समता प्रतिष्ठान, (मंगळवार पेठ) पुणे तर्फे 
दि. जानेवारी २०२१ रोजी महात्‍मा फुले वाडा गंज पेठ, 
समता भूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी 
मुली आणि विशेषतः महिला यांनी भेट दिली.



यावेळी मुलींना सर्व वाडा दाखविण्यात आला. 
त्यामध्ये आतील विहीर, खोल्या यांचाही भाग दाखविण्यात आला. 


महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. 


याप्रसंगी कु. ऋतुजा नराल या ताईने 
सर्व महिला उपस्थित मुलीना सावित्रीबाईंच्या कार्याची नीट 
सविस्तर माहिती दिली आणि प्रबोधनही केले.








याच मुलींच्या गटातील कु. स्नेहल लालबिगे या मुलीने 
तू बुद्धी दे, तू तेज दे हि प्रार्थना हि यावेळी सदर केली. 





रेखा गायकवाड यांनी सावित्रीच्या ओव्या गाऊन 
उपस्थिताना सावित्रीबाईच्या कार्याची एक ओळखच करून दिली  


यावेळी समता प्रतिष्ठानचे संदीप मोरे, रेखा गायकवाड, अमृता मोरे, रेश्मा लेंगरे उपस्थित होते. 
महिला पालक हि यावेळी उपस्थित होत्या. समता प्रतिष्ठान मार्फत आंगण या अभ्यासिकेतील विद्यार्थिनी हि उपस्थित होत्या. 


Tuesday, 15 December 2020

आपले बाबासाहेब नाटकाचे सादरीकरण ( सन २०१९ )

 

समता प्रतिष्‍ठानमंगळवार पेठपुणे
संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी यांनी केले 
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन ( सन २०१९ ) 

दि१११५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्‍ठान संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी (३ री ते १० वी यांनी महात्‍मा फुले ज्‍योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले बाबासाहेब’ या नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केलेसंपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्‍टीरूप बाबासाहेबांच्या गोष्‍टीवर आधारित असून त्‍याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम श्रीसंदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत करून केले.

मंगळवार पेठेतील भिमनगरइंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं२ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतयेथील विद्यार्‍थ्‍यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहेसाधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.

साधारण डिसेंबर ते मार्च या कालावधीत मुलांना नाटक आणि पथनाट्‌य याची माहिती देण्यात आलीत्‍यासाठी आवश्यक काही उपक्रम घेण्यात आलेअभिनय कार्यशाळासंवादफेक याची जुजबी माहिती मुलांना देण्यांत आलीत्‍यानंतर नाट्‌वाचन व पाठांतर असा साधारण परिपाठ करून एक महिना यावर मेहनत घेण्यात आली.

मग प्रसंग आणि नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्‍याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार सुट्‌टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्‍वरूप दिले गेले

याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना 
सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं 
देखील अतिशय हृदयस्‍पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया सर्व उपस्‍थितांनी दिली.

नाटकाचा कोणताही अनुभव नसतानाकधीही रंगमंचावर न गेलेल्‍या गल्‍लीतील मुलांची अभिनयाची चुणूक पाहून सर्व नागरीकरहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं लहानपणत्‍यावयात त्‍यांना आलेले अनुभवउच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभवआणि यासर्वातून त्‍यांनी अत्‍यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठावसंघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतोविषमतेचे दाहक अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

भिमनगर मंडळ येथील सांस्‍कृतिक महोत्‍सावाचे उद्‌घाटन याच नाटकाच्या सादरीकरणातून करण्यात आलेभिमनगरमधील मोठ्‌या संख्येने रहिवासीतसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी हे यावेळी उपस्‍थित होते.  तसेच पी.एम.सी.कॉलनी नं२ मंगळवार पेठ येथे ही हे नाटक सादर करण्यात आले

त्‍यानंतर पारगे चौकमंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळेसंस्‍थासंघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्‍या विधायक जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आलीसंपूर्ण चौकच जणू निःशब्‍द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्‍यंत शांतपणे हे नाटक पाहत होतायावेळी याच कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आलाअसा उपक्रम पहिल्‍यांदाच मंगळवार पेठेत घेतला 
असल्‍याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.




Monday, 14 December 2020

GROUND ACTIVITY 2019

 

समता प्रतिष्ठाण, पुणे 

मैदानी खेळ आणि सुट्टीची धम्माल 


आबासाहेब अत्रे प्रशालेत मुलांना खेळण्यासाठी दर रविवारी नेण्यात आले 


लंगडी, खो खो असे विविध मैदानी खेळ यावेळी घेण्यात आले 


गाणी, गप्पा आणि विविध विषयावर मुलांसोबत चर्चा करण्यात आली 


MAHILA DIN PROGRAMM

 

समता प्रतिष्ठाण, पुणे 

महिला दिन विशेष  कार्यक्रम 


यावेळी महिला पालक यांना एकत्र करून छान स्पर्धा घेण्यात आल्या 


याप्रसंगी रेश्मा लेंगरे, अपर्णा चव्हाण, अमृता मोरे, पल्लवी वेलेकर, प्रियांका परदेशी 
यांनी महिलांना एकत्र करून महिला दिनाचे महत्व आणि माहिती सांगितली 


सर्व महिला पालक यांनी या कार्यक्रमाचा आनद घेतला