समता प्रतिष्ठान सन २०१४ पासून भिमनगर, मंगळवार पेठ येथील परिसरात विविध शैक्षणिक प्रकल्पांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करीत आहे. व्यसनमुक्ती व्याख्यान, करीअर गाइडन्स, शैक्षणिक संधीबद्दल मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथील वस्त्यांमध्ये काम करीत आहे.
म. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ.बा.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाशिवाय समाजाची आणि देशीच प्रगती होऊ शकणार नाही या विचाराने प्रेरित होऊन काही समविचारी आणि शिक्षित तरूण/तरूणी यांनी एकत्रित येऊन हे काम सुरू केले आहे.



दि. २७ जून २०१६ पासून भिमनगर मंडळ, तक्षशिला महिला मंडळ यांच्या
संयुक्त विद्यमाने व सहकार्याने एक अभ्यासिका भिमनगर येथे सुरू करण्यात आली.
सुरूवातीला ५-१० विद्यार्थी असणारी अभ्यासिका आज किमान २५-३० जण नियमित
विद्यार्थीची झालेली आहे.
स्व-रूपवर्धिनी, पुणे मनपा कामगार युनियन यांच्या सहकार्याने आणखी ३ वस्त्यांमध्ये नवीन अभ्यासिका सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व अभ्यासिकांमध्ये सरासरी २०-२५ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. या अभ्यासिकेतील विद्यार्थींना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप समता प्रतिष्ठान व सेवा सहयोग या संस्थेच्या सहकार्याने केले जाते. याही वर्षी साधारण १०० विद्यार्थी यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास प्रा. विजय उर्फ धम्मधर गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच याच भागातील कॉंग्रेस (आय)च्या प्रभाग अध्यक्षा श्रीमती जयश्री कांबळे याही आवर्जून उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड यांनी मुलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील व जीवनातील महत्वाच्या गोष्टी साध्या शब्दांत सांगितल्या. आतापासूनच शिक्षणाची कास धरल्यास पुढे तुम्हीही चांगल्या मार्गावरून पुढे जाल अशी आशा व्यक्त केली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इ. १० वीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तसेच पी.एस.आय.पदी निवड झालेल्या कु. करूणा चव्हाण हीचा देखील जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पालक, विद्यार्थी यांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
कु. करूणा चव्हाण हीने
मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि तिने स्वतःचे
काही अनुभवही मुलांसमोर मांडले.
यानंतर पालकांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांनतर अभ्यासिकेचा वाढदिवस छोटया मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. शेवटी प्रार्थना घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र चव्हाण (विश्वस्त,
समता प्रतिष्ठान) यांनी केले. तर सूत्र संचालन अभ्यासिकेचीच एक विद्यार्थीनी
सानिका सरोज (इ.९वी) हिने केले. तर आभार सौ.अपर्णा चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी समता प्रतिष्ठानच्या
अध्यक्ष सौ. अपर्णा चव्हाण, विश्वस्त रेश्मा लेंगरे, रवींद्र चव्हाण, संदीप मोरे,
शुभम वेळेकर आणि कार्यकर्ते पल्लवी वेळेकर, प्रियंका परदेशी, सुप्रज्ञा चव्हाण,
पल्लवी सरोदे, दिक्षा घोडके, मयूर खांदोडे, संतोष शर्मा हे ही उपस्थित होते.
Good work...
ReplyDelete