सन्मती बाल निकेतन केंद्र
रक्षाबंधन कार्यक्रम
दरवर्षी रक्षाबंधन निमित्त समता प्रतिष्ठान, पुणे संस्थेच्या माध्यमातून समाजातील सामाजिक संस्था, संघटना याठिकाणी रक्षा बंधन कार्यक्रम घेत असते. पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि रस्त्यावरील कामगार, मजूर यांनाही कार्यकत्या महिला, मुली या राखी बांधतात.
या वर्षी प्रयत्नपूर्वक नियोजन करून सन्मती बाल निकेतन केंद्र याठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला.
सुरूवातीला समता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संस्थेची माहिती मुलांना दिली. काही गाणी, गोष्टी आणि मुलींनी नृत्य सादर केले.
नंतर मुलांना रक्षाबंधन करून, औक्षण करून सुंदर असा कार्यक्रम पार पडला.
कै. सिंधुताईंच्या कन्या ममताताई यांनी समता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय माईंची आठवण म्हणून पुस्तक भेट देऊन सन्मान ही केला.
No comments:
Post a Comment