Labels

Wednesday, 10 January 2024

9th Anniversary Programme Dated 07.01.2024

 


समता प्रतिष्ठानच्या ९ व्या वर्धापन दिना निमित्त 

विविध गुणदर्शन कार्यक्रम व शालेय साहित्य वाटप.....!

               दि. ७ जानेवारी क्रां.सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती    निमित्त आणि समता प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्यास ९ वर्ष पूर्ण झाली. 

    समता प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून विशेषतः   झोपडपट्टीच्या भागात राहाणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या मुलांमुलीना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शिक्षणापासून    वंचित राहू नये म्हणून समता प्रतिष्ठानच्या या शैक्षणिक उपक्रमास विविध संस्थाच्या व दानशूर, प्रतिष्ठीत व्यक्तींच्या  सहकार्याने शिक्षणाचे वर्ग चालवले जातात तसेच संगणकाचे पायाभूत शिक्षणही दिले जाते. या उपक्रमात स्वतःहून उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होतात. 

    सदर कार्यक्रम श्रमिक भवन एकलव्य सभागृह येथे घेण्यात आला. समता प्रतिष्ठान च्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचे विविध कला गुण दर्शन कार्यक्रम, तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमास शशिकांत शिंदे, एम.डी. होमियोपॅथी व सचिव माळी महासंघ, महाराष्ट्र प्रमुख पाहुणे तसेच स्वप्निल कांबळे, सी.आर.पी.एफ. सब इन्स्पेक्टर चेन्नई,  वैजिनाथ गायकवाड, सचिव पुणे मनपा कामगार युनियन, योगेश्वरी भोसले, अंनिस कार्यकर्ते, अपर्णा चव्हाण अध्यक्षा समता प्रतिष्ठान  शुभम वेळेकर खजिनदार, समिती सदस्या रेखा गायकवाड, अमृता मोरे, विनोद शर्मा व  संदीप मोरे, संस्थापक, समता प्रतिष्ठान हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

        तसेच कार्यकर्ते सानिका सरोज, तनिष्क उबाळे, मयूर ढावरे, अदिती साठे, नियती परदेशी, साक्षी जाधव, श्रेया मोरे, सानिका चव्हाण, सम्यक चव्हाण, करूणा चव्हाण, श्रावणी धाराशिवकर, निशाद शेख, अमन शेख, राज कदम, राजश्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सर्व नियोजन, आयोजन करण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता मोरे यांनी केले तर . सौ. अपर्णा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तसेच आभार प्रदर्शन अदिती साठे यांनी केले. 

      डॉ. शशिकांत शिंदे याप्रसंगी सर्व उपस्थित पालक व विद्यार्थी यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शिक्षणाशिवाय भविष्यात आपण काहीच करू शकणार नाही. बुद्धयांक महत्वाचा आहेच पण त्यासोबतच भावनांक व सामाजिक जाणीव ही अत्यंत महत्वाची आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

         स्वप्निल कांबळे यांनी सुरूवातीला सफाईचे काम करून अभ्यास सुरू ठेवला. त्यामुळे  अधिकारी होण्यासाठी आईच्या मार्गदर्शनाने आज पोलिस इन सी.आर.पी.एफ. या पदावर बढती मिळाली व स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यामुळे समता प्रतिष्ठान करत असलेले काम हे अत्यंत महत्वाची  भूमिका आज बजावत असल्याचेही सांगितले. 

        वैजिनाथ गायकवाड यांनी समता प्रतिष्ठान करत असलेल्या कामाचे कौतूक करत खरंच आज समाजात समतेचा विचार व व्यवहार दोन्ही आचरणात आणावेत असे उपस्थितांना सांगितले. शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार समता प्रतिष्ठान करत आहे. यात सर्वांनी हातभार लावावा, सहकार्य करावे हे त्यांनी विशेष नमूद केले. 

           या प्रसंगी ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व उत्कृष्ठ सादरीकरण करणा-या व शैक्षणिक उपक्रमात काम करणा-या कार्यकर्त्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.




                                              

          




















































































































































No comments:

Post a Comment