संविधान संवर्धन व जनजागृती नाटय कार्यशाळा
भारत
हा विषय कालच्या कार्यशाळेचा होता.
मुलांनी आपल मत, विचार याप्रसंगी मांडले.
देश म्हणजे काय ?
राज्य म्हणजे काय ?
संविधान का व कशासाठी ?
माझी नागरिक म्हणून काय भूमिका ?
असे मुद्दे काल चर्चिले गेले.
अनेकांनी पुढे येवून आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला.
भाषण
ही छोटी शॉर्ट फिल्म मुलांना दाखवण्यात आली.
चोरलेले भाषण की स्वतः लिहिलेले भाषण करायचे ?
या गोष्टीतून मुलांच्या प्रामाणिक, निरागस बुद्धीचे उत्तम दर्शन मुलांना झाले.
राम दादा ने खूपच हसत, खेळत आणि सहज सोप्या पद्धतीने विषय हाताळला.
तो गेली 5 वर्ष बालनाट्य विषयात काम करत आहे. स्वतः एक उत्तम कलाकारही आहे.
इ. 5 वी चे पुढील 17 विद्यार्थि व १० वी च्या पुढील ६ जण उपस्थित होते.





No comments:
Post a Comment