Labels

Wednesday, 3 May 2023

Summer Camp 21-23 April 2023

 

उन्हाळी शिबिर 

२१ - २३ एप्रिल 

अभ्यास कौशल्य, कथा, गप्पा, अंधश्रद्धा, विज्ञान आणि चमत्‍कार 
आणि नृत्‍य 
या विषयावर शिबिरात धम्माल, मज्जा, मस्ती करण्यात आली

आजचा पहिला दिवस 

एकूण मुलं आणि मुली 45 
कार्यकर्ते गट 12 

पहिलं सत्र - 
चमत्कार आणि विज्ञान, अंधश्रध्दा म्हणजे काय ? यावर झालं.
मिलिंद देशमुख आणि नलिनी जाधव यांनी हे सत्र घेतले











खूप छान आणि जबरदस्त असे प्रात्यक्षिक करून दाखवली 
मुलींनी प्रश्न विचारले, माहिती घेतली 
या सत्राच्या वेळी एक जर्मन पत्रकारही उपस्थित होती. त्यांनीही आपली बातमी घेतली आहे. 


दुसरे सत्र गणित आणि हस्तकला, कोडी यांचं झालं.
दिप्तीताई डोळे यांनी हे घेतल.






प्रत्यक्ष खेळणी, कागद आणि घड्या घालून मुलांना गणिताची गोडी निर्माण केली 
2 तास मुलं गुंगून गेली होती. 

सत्र 3 रे

आम्ही सारे भारतीय 
कृतार्थ, महेश आणि गौरी ताई या गटाने संविधान मुलांना समजेल असे नाटक मांडणी केली, खेळ घेतले, गाणी घेतली, मज्जा करत करत एक गंभीर विषय मुलांनी अभ्यासला.

शेवटी मुलं आनंदात घरी गेली. 

असा आजचा दिवस पार पडला. 

उद्याही मज्जा मस्ती धम्माल असणार आहे. 

नाटक, 
रंगमंच खेळ, 
सादरीकरण 

होणार आहे. 

सर्वांनी मुलांसोबत या शिबिराचा आनंद घ्यावा अशी विनंती. 

सानिका, श्रेया, नियती, संग्राम, अमन, सम्यक, सायली, श्रावणी ( आर्या), करुणा, प्राजक्ता, समृद्धी, अमृता यांनी आज सगळी धुरा सांभाळली. 

उद्या या, भेटूया. 


दिवस दुसरा

सकाळी वैक्तिक माहिती भरून घेतली 

सुभाष चलवादी यांनी काही खेळ, गप्पा आणि मार्गदर्शन केले. 



दुपारच्या सत्रात कृतार्थ दादाने विविध खेळ घेतले. 
मुलांना नवीन गोष्टी सांगितल्या. 






काही रंगमंच निगडित अशी रचना बंनविने असे उपक्रम घेतले. 
त्या मुलांनी करून दाखवल्या. 
एक समस्या घ्या, ती मांडा आणि सोडवा.. 








यानंतर आपली प्रार्थना घेवून मुलांना सोडण्यात आले. 

आज अपरणा, अमृता, सौरभ, सानिका, श्रेया, नियती, सायली, करुणा, आर्या, अमन, सम्यक, प्राजक्ता, समृद्धी यांनी सर्व नियोजन पाहिलं. 

आजचा तिसरा दिवस 

सकाळी 11 ते 12 
डान्स स्पर्धा तयारी केली 

12 ते 1 
पर्यावरण पूरक गोष्ट सादरीकरण तयारी  स्पर्धा झाली 
यात मुलांनी झाडे वाचवा, झाडे जगवा नाटक सादर केले






2 - 3.30 डान्स सेशन झाले 
मुलांना थांबावं लागलं इतकं छान घेतल तनिष्का पटेल ताईंनी 






सानिका आणि श्रेया ने पहिल्यांदाच सगळे नियोजन पहिले
इतर सर्वांनी त्यांना जोरदार मदत केली. 

एक टीम, गट म्हणून मस्त काम केलं सर्वांनी. 

साधारण 40 विद्यार्थि आणि 10 कार्यकर्ते रोज उपस्थित होते

































































No comments:

Post a Comment