समता संध्या शिक्षण केंद्र
मंगळवार पेठ, पुणे
समता व मासूम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला प्रकल्प
मासूम, मुंबई ही संस्था गेली १० वर्षे इ. ५ वी ते १० वी नापास विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी मोफत शिक्षण, मोफत शालेय साहित्य ( वह्या, पुस्तके, प्रयोग साहित्य ) देण्याचे काम करते. याच संस्थेच्या सहकार्याने समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५५ विद्यार्थींना एस.एस.सी. परिक्षेकरीता सर्व तयारीनिशी बसविण्यात आले.
यासाठी सर्व्हे करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, ऑनलाईन क्लासकरीता प्रशिक्षित करणे, रोजच्या क्लासकरीता आग्रह धरणे, परिक्षेची माहिती व मार्गदर्शन करणे अशी कामे मासूम आणि समता च्या माध्यमातून करण्यात आली आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून यशस्वीरित्या परिक्षा दिली आहे. लवकरच त्यांचा निकाल लागेल व ती पुढील शिक्षणासाठी तयार होतील.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरता सध्या सर्व्हेचे काम सुरू आहे. साधारण ५०-६० विद्यार्थींची बॅच तयार करून पुढील शिक्षणाची तयारी करण्यात येत आहे.
यासाठी मासूम केंद्र प्रमुख ( सौ. अश्विनी गायकवाड मॅडम), समता समन्वयक ( सौ. गिता शर्मा), फिल्ड मोबीलाईझर ( सौ. मंजूळा कांबळे) मिळून हे काम पाहत आहेत.
No comments:
Post a Comment