१० जानेवारी २०२१
६ वा वर्धापन दिन
समता प्रतिष्ठान, पुणे
दि. १० जानेवारी ६ वा वर्धापन दिन कार्यक्रम बातमी
क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांच्या जन्मदिनी समता प्रतिष्ठान या संस्थेला
६ वर्ष पूर्ण होत असल्याने दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
किमान मुली महिलांना सावित्रीबाई आणि त्यांच्या कामाची ओळख तरी व्हावी आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण आणि सामाजिक कामात नवीन काहीतरी घडवावं असा उद्देश यामागे होता आणि आहे.
४ वर्षात पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत. याच अभ्यासिकेतील विद्यर्थ्याना आपली कला सदर करणे आणि त्यांच्या कला गुणांना वाव देणे या उद्देशाने दरवर्षी स्नेह संमेलना सारखाच हा कार्यक्रम घेण्यात येतो.
तसेच उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देवून, खावू ही देण्यात आला.
ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली त्यांचा व सहकार्य केले अशा सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्क्रमासाठी श्री. विजय नवले सर ( करिअर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ते ) उपस्थित होते.
त्यांनी यावेळी अत्यंत छान सोप्या पद्धतीने उपस्थित पालक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. समता प्रतिष्ठान करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. वास्तीपातालीवरील मुला / मुलींना शिक्षणासाठी मदत करणे यासारखे महत्वाचे काम ते करत आहेत. एवढेच नाही तर समाजा प्रती असलेली आपली कृतज्ञता हि त्यांनी पोलिस, डॉक्टर आणि काही कर्मचारी यांचा सन्मान करून व्यक्त करत आहेत.
अशा स्वरुपाची कामे सहसा फार आपल्याला आढळून येत नाहीत.
आज अनेक ठिकाणी समाजात असलेल्या गरजांचा विचार करता अशा कामाची गरजचा राहता कामा नये अशी परिस्थिती निर्माण करणे आपल्या विद्यर्थी पालकांच्या हातात आहे.
याकरिता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व महिला मुली यांनी या कामातून प्रेरणा घेवून पुढे जावून आणखी छान काम करावं अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
या कार्यक्रमासाठी समता प्रतिष्ठानचे चे पदाधिकारी सौ. अपर्णा चव्हाण ( अध्यक्ष ), सौ. रेश्मा लेंगरे-कारभारी ( कार्यध्यक्ष ), सौ. अमृता मोरे ( विश्वस्त सदस्य ), सौ. रेखा गायकवाड ( विश्वस्त सदस्य) कु. पल्लवी सरोदे ( विश्वस्त सदस्य ), श्री. संतोष शर्मा ( विश्वस्त सदस्य ), इतर कार्यकर्ते दीपक वारे, शीतल शेखे, राजश्री जाधव, रिया उबाळे, सौरभ वेळेकर, सम्यक चव्हाण, अमन शेख, ताई अर्जुन, नरेश लालबिगे, निशांत वाघमारे आणि या कार्यक्रमासाठी साठी सहकार्य करणारे विद्यार्थी संग्राम उबाळे, राज कदम ही उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी कोरोना सन्मानार्थी म्हणून श्री. बालाजी शेंडगे ( ए.पी.आय.) श्री. थरकुडे ( ए.एस.आय.), डॉ. नेहा देशपांडे ( पीएमसी ), श्री. किशोर भोसले सर समाजिक कार्यकर्ते, श्रीमती आशा चव्हाण (आया), श्रीमती मधुमती मिसाळ ( सफाई कामगार ) हे उपस्थित होते. यांचा सत्कार एक पुस्तक ( चरित्र ) देवून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी सरोदे यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. अमृता मोरे आणि आभार प्रदर्शन सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले.
यावरही या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष काम केलेल्या पोलीस, डॉक्टर आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.