Labels

Monday, 4 May 2020

समता प्रतिष्‍ठान संचालित उपक्रम - ४ अभ्‍यासिका



समता प्रतिष्‍ठान, पुणे.

समता प्रतिष्‍ठान संचालित उपक्रम -  ४ अभ्‍यासिका सद्यस्‍थिती मंगळवार पेठेत मागील ६ वर्षांपासून 

समता प्रतिष्‍ठान हि संस्था भिमनगर आणि जवळच्या परिसरात  सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक 

उपक्रम राबवीत आहे.   यातीलच एक उपक्रम म्हणजे मोफत अभ्यासिका वर्ग. 


विद्यार्थी करिता मोफत अभ्‍यासिका घेण्याचे काम सातत्‍याने करीत  आहे. या अभ्‍यासिकांच्या माध्यमातून 


मुख्यतः मुलांचा स्‍वविकास आणि पर्यायाने कुटुंबाचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाही विकास असा 

हेतू आहे. या उपक्रमामध्ये मुख्यतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर जास्‍त भर दिला जातो. 

 


केवळ घोकंपट्‌टी करण्यापेक्षा संकल्‍पना स्‍पष्‍टीकरण करणे यावर लक्ष केंद्रीत केले जाते.  स्‍पून फिडिंग 

न करता स्‍वयंअध्ययन कसे  करतील यासाठी मार्गदर्शन केले जाते. याकरीता खेळघर, भूमी सारख्या 

संस्‍थाची मदत घेतली जाते.  त्‍यांच मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. 




यासाठी काही स्‍वयंसेवक येऊन मार्गदर्शन


करण्याचे कामही शनिवार, रविवार 



करतात. त्‍याचबरोबर अभ्‍यास सहली, 



चर्चासत्रे, उन्हाळी हिवाळी शिबीरे घेतली 



जातात. ज्‍यामुळे विद्यार्‍थ्‍यांना आणखी 

सखोल ज्ञान या विषयांचे मिळते.

सध्या भिमनगर, इंदिरानगर, 

पी.एम.सी.कॉलनी नं. २, न्यू भिमनगर, सर्व 

अभ्‍यासिका या मंगळवार पेठे  येथे घेण्यांत 

येतात. यामध्ये साधारण २०-२५ विद्यार्थी 

आठवडयातून ५ दिवस सोमवार ते 

गुरूवार  सांयकाळी  ६ ते ८ या वेळात  असतात. 



तसेच शनिवार, रविवार  विशेष गणित, इंग्रजी आणि संगणक वर्ग 

सकाळी ९ ते ११  भूमी या संस्‍थेमार्फत घेतले जातात.










"गोष्टरंग" - एक मजेदार नाट्य अनुभव 

गोष्टरंग. 

दिवाळी सणाच्या निमित्ताने समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे 
दरवर्षी विविध उपक्रम विद्यार्थ्यांकरिता राबवीत असते. दिवाळी शिबीर, दिवाळी सहल, दिवाळी भेट. 
यापैकीच एक उपक्रम या सुट्टीत राबविला. 




''क्वेस्ट'' संस्थेच्या, माध्यमातून.  शिक्षण क्षेत्रात भाषा आणि गणित यासाठी विशेष उल्लेखनीय असं काम करणारी पालघर, सानोळा येथील संस्था. 
यांचाच एक उपक्रम आहे गोष्टरंग. 



देशविदेशातील लहान मुलांसाठी तयार केलेल्या गोष्टी. 
या गोष्टींचं अप्रतिम असं मनोरंजनात्मक सादरीकरण. 
हा कार्यक्रम आम्ही समता प्रतिष्ठानच्या आणि पुणे मनपा  कामगार युनियन च्या  सहकार्याने 
दि. २३ ऑक्टोबर २०१९ सांयकाळी ६ ते ८ यावेळात  श्रमिक भवन,  शिवाजीनगर येथे सादरीकरण करण्यात आले. 





मंगळवार पेठेतील ४ अभ्यासिकामधील ५० विद्यार्थी आणि १० कार्यकर्ते, पत्रकार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला. 
केवळ टी.व्ही  आणि मोबाईल च्या जाळ्यात गुंग असलेली आजची बालगोपाळांची आणि युवकांची पिढी आपण आज अवती भवती पाहत आहोत. म्हणूनच आम्ही समता प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांना सतत त्यांच्यातील सुप्त गुण, जाणीवा समृद्ध करण्याचा प्रयत्न मागील ५ वर्षांपासून करीत आहोत.


यामध्ये चांदण्यातील गप्पा ( लहान  सादर केलेल्या विविध देशातील गोष्टी ), पथनाट्य, वाचन चर्चा असे विविधांगी उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे करत आहोत. 
या आमच्या कामात क्वेस्ट सारख्या सामाजिक भान असलेल्या संस्था, व्यक्ती  मदतीला धावून येतात त्यामुळे आजपर्यंत आमचं हे काम अविरत चालू आहे. 

सर्व गोष्टरंग टीमची अदभूत अशी ऊर्जा पाहून केवळ आणि केवळ आश्चर्य वाटत राहते. मुलांच्या मनोभावना, कल्पना यांचा सुयोग्य असा विचार करून लिहीलेल्या गोष्टी, गाणी जबरदस्त. त्यातच  अप्रतिम असे गीतांजली ताईं कुलकर्णी  यांचे दिग्दर्शन यासाठी शब्दच नाहीत.

कमीत कमी साहित्य, रंगमंच यांचा चपळतेने केलेला उपयोग केवळ अवार्णिनीय असाच होता. त्यात इतर देशातील माहित नसलेल्या  भूभागातील लोकांच्या गोष्टी योग्य भावभावनांच्या माध्यमातून केलेलं सादरीकरण खूपच मनाला स्पर्श करणारे होते.
याची प्रचिती म्हणजे कलाकारांबरोबर मुलंदेखील गात होती, प्रतिसाद देत होती, रमून जात होती. यालाच तादात्म्य पावणं असं म्हणत असावेत बहुतेक. यातच संपूर्ण कलाकारांचे खरे यश दडले आहे. संपूर्ण शरीर आणि हावभावाचा उपयोग कसा करावा याच उत्तम उदाहरण हे या कलाकारांनी घालून दिलेलं आहे.


येवढ्यावेळ ५ वी ते १० वी च्या गटातील विद्यार्थी असा मनमुराद आनंद घेत एखाद्या नाटकाच्या विषयात रंगून जाणं हा अनुभव आमच्यासाठी तरी अगदी नवीनच होता.



जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आपण नाममात्र शुल्कात आमच्या वस्तीपातळीवरील मुलांसाठी केलेलं हे योगदान नक्कीच भविष्यात त्यांच्या आयुष्यात लक्षात राहणारे आणि उपयोगी पडेल असेच आहे.