दि. २ ऑक्टोबर २३ रोजी समता प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी यांनीआगाखान पॅलेस येथे भेट दिली.महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य काही काळ या ठिकाणी होते.त्यांची स्मृती म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. अभ्यासिकेतील मुलांना इतिहासाची ओळख व्हावी व महापुरूषांची ओळख व्हावी हा उद्देश या भेटीमागे होता.सर सुलतान महंमदशाह आगाखान, तिसरे यांनी आगाखान पॅलेस बांधला.तो कस्तुरबा गांधीजी यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देशास अर्पण करण्यात आला.छोडो भारत आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई देसाई यांना या पॅलेसमध्ये स्थानबद्ध करून ठेवले होते. कस्तुरबा गांधी व महादेव भाई ( मानस पुत्र ) यांनी याच वास्तूत अखेरचा श्वास घेतला.








