समता प्रतिष्ठान
मंगळवार पेठ, पुणे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त
अंतर्गत अंगण अभ्यासिका यांचा सातवा वर्धापन दिन
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बॅग भेट देण्यात येते. यासाठी सेवा सहयोग यांचे मोलाचे सहकार्य लाभते. आज या कार्यक्रमाला श्रीमती प्राची कचरे सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, त्याचबरोबर किरण इंगळे अध्यक्ष, रोटरी क्लब, सहवास पुणे तसेच श्री. मधुकर नरसिंगे कार्याध्यक्ष, पुणे महानगरपालिका कामगार युनियन, श्री. वैजनाथ गायकवाड, ऑफिस सेक्रेटरी पुणे महानगरपालिका कामगार युनियन, तसेच माजी कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री. रवींद्र वैद्य प्रोफेसर आय एम सी सी कॉलेज पुणे असे सर्व मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संदीप मोरे, अध्यक्ष सौ. अपर्णा चव्हाण तसेच विश्वस्त मंडळातील पदाधिकारी सौ. अमृता मोरे, खजिनदार शुभम वेळेकर व अन्य सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. प्राची कचरे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले मेकअप करून फार छान होण्यापेक्षा स्वतःमधील बुद्धिमत्ता, शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. एकाच चौकटीत न राहता आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजे. तरच आपली प्रगती होईल. त्यानंतर श्री किरण इंगळे यांनी मुलांना उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता अंगी बनवणे किती गरजेचा आहे हे त्यानी पटवून दिले. व्यवसाय उद्योजकता यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावून सांगितले. तसेच मधुकर नरसिंगे यांनी अभ्यास, शिक्षण आणि शिक्षणामुळे होणारे जीवनातील बदल मुलांना समजावून सांगितले. श्री. रवींद्र वैद्य यांनी मार्गदर्शन करताना खूप मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून न जाता साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा छान आयुष्य जगता येतं, शिक्षण घेता येतं, हे सांगितलं. समता प्रतिष्ठानच्या कामाच्या माध्यमातून होणारा बदल हा नक्कीच तुम्हाला भविष्यात एका चांगल्या पदावर किंवा एखाद्या चांगल्या भविष्याशी निगडित ठरू शकेल असं त्यांनी सांगितलं. श्री. वैजनाथ गायकवाड यांनी सुद्धा बोलताना समता प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीचा आपल्या जीवनामध्ये नक्की समावेश करा हे सांगितले.
जे विद्यार्थी वर्षभर नियमित येत होते, उपक्रमात उत्तम सहभाग घेत होते अशा विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. ज्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले अश्यांना शाबासकी म्हणून भेट स्वरूपात वस्तू देण्यात आली.
सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्व उपस्थीत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपापले कलागुण सादर केले. छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ यांची माहिती मुलांनी सांगितली. तसेच विविध नृत्य सादर करून मुलांनी पालकांची मने जिंकली.
सौ. अमृता मोरे यांनी या कार्यक्रमाचे शेवटी आभार मानले.
या सगळ्या कार्यक्रमासाठी मदत करणारे अमन शेख, संम्यक चव्हाण, तनिष्क उबाळे, मयूर ढावरे,कार्तिक शेलार, राज कदम, सानिका सरोज, नियती परदेशी, श्रेया मोरे, प्राजक्ता कांबळे, सोनाली साठे, श्रावणी धाराशिवकर, करुणा चव्हाण, सानिका चव्हाण, निषाद शेख, श्रावणी शिरोळे, शुभम वेळेकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियती परदेशी या कार्यकर्तीने केले.