Labels

Monday, 13 June 2022

School Kit Distribution Program - 12-06-22

 

समता प्रतिष्ठान, पुणे

सेवा सहयोग फौंडेशन, पुणे 

पुणे महानगरपालिका कामगार युनियन 

समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे व सेवा सहयोगच्या आणि पुणे मनपा कामगार युनियन यांच्या सहकार्याने शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

याप्रसंगी अतुल भालेराव यांनी सर्व उपस्थित पालक व विद्यार्थीना करियर विषयी चांगले मार्गदर्शन केले. भविष्यात मुलांनी काय करावं याचा वेध आत्तापासूनच घ्यावा असंही सुचवलं. समता प्रतिष्ठान  करीत असलेल्या कामास आम्ही नक्कीच मदत करू. त्यासाठी शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. यात पालकांनी योग्य ती मदत संस्थेला करणे अत्यंत गरजेचे आहे. अस आव्हान पालकांना केले. 

विद्यार्थी व  पालक यांनी आपले मनोगत यावेळी छान शब्दात व्यक्त केले. समता प्रतिष्ठान करीत असलेले काम हे आमचेच घरातील, कुटुंबातील काम आहे यासाठी आम्ही नक्कीच चांगले सहकार्य करू अस पालकांनी मनोगत व्यक्त केले.  

पुणे मनपा कामगार युनियन कार्यालयीन चिटणीस यांनी यावेळी समता प्रतिष्ठान च्या कामाचे महत्त्व स्पष्ठ करून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा या कामातून पुढे नेला जात आहे. शिक्षण हाच सर्व समस्यांचा उपाय असल्याने समता प्रतिष्ठान ने हे काम हाती घेतले आहे. यासाठी आम्ही सदैव समताच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

सर्व उपस्थित विद्यार्थींना पालकांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटून मग प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले ( अध्यक्ष, समता प्रतिष्ठान ) , प्रास्ताविक सौरभ वेळेकर ( अभ्यासिका समन्वयक ), तर आभार प्रदर्शन रिया उबाळे ( अभ्यासिका समन्वयक ) नी केले. 

या कार्यक्रमासाठी संग्राम उबाळे, सम्यक चव्हाण, मयूर ढावरे, राज कदम, सानिका सरोज व अमृता मोरे यांनी सर्व आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती. 

अत्यंत उत्साह आणि आनंदी वातावरणात हा कार्यक्रम छान पार पडला.

या प्रसंगी समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदीप मोरे, अध्यक्षा सौ. अपर्णा चव्हाण,  विश्वस्त सदस्य सौ. अमृता मोरे,  सेवा सहयोग फाउंडेशन समन्वयक श्री. शेखर अभ्यंकर, कागद काच पत्रा संघटनेचे समन्वयक श्री.  अतुल भालेराव, श्री. वैजिनाथ गायकवाड ( ओफिस सेक्रेटरी)  पुणे मनपा कामगार युनियन, विशेष सन्मानार्थी कु. दिशा खंडाळे, जय सोनवणे, उपस्थित होते. ज्यांनी अत्यंत कठिण परिस्थितीत ही उत्तम यश संपादन केले आहे. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. 


                                        

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. 



अभ्यासिकेत येणारी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करताना 



कार्यक्रमाचे  सूत्र संचालन करताना समता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अपर्णा चव्हाण 




कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर करताना अभ्यासिका समन्वयक सौरभ वेळेकर 



प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवर यांची ओळख करून देताना समता प्रतिष्ठानची कार्यकर्ती व अभ्यासिका समन्वयक सानिका सरोज 


सेवा सहयोग फाऊंडेशन चे सहकारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले 


१२ वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले 


१२ वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले 


१२ वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले 


१२ वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले 


आंगण अभ्यासिकेतील विद्यार्थाच्या पालकांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले 


आंगण अभ्यासिकेतील विद्यार्थानी  या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले 


श्री. वैजिनाथ  गायकवाड ( ऑफिस सेक्रेटरी, पुणे मनपा कामगार युनियन ) यावेळी मनोगत व्यक्त करताना 





प्रमुख मार्गदर्शक श्री. अतुल भालेराव हे पालक व विद्यार्थी यांना उद्देशून मार्गदर्शन करताना
 

शालेय साहित्य वाटप करताना 



शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 



शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


शालेय साहित्य वाटप करताना 


पालकांच्या आग्रहाखातर काढावा लागलेला असा एक सेल्फी 


                                       

                                       

सर्व बाल चमुंना साहित्य मिळाल्यानंतर एकत्रित असा हा आनंदी क्षण 

                                        

                                        

कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते संवाद साधताना आणि अनुभव शेअर करताना